Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 5 July 2026, 18:05

पुणे: महाराष्ट्र सरकारने राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मध्ये सुधारणा करून गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र तरतुदी करण्यात आल्या आहेत. या बदलांमुळे सोसायट्यांचा कारभार अधिक पारदर्शक होण्याबरोबरच सदस्यांवरील आर्थिक भार कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नवीन नियमांनुसार सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काच्या पद्धतीत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये फ्लॅटच्या क्षेत्रफळानुसार मेंटेनन्स आकारला जात होता. त्यामुळे मोठ्या फ्लॅटधारकांना अधिक पैसे भरावे लागत होते. आता मात्र सेवा शुल्क सर्व सदस्यांकडून समान प्रमाणात आकारले जाणार आहे. त्यामुळे मेंटेनन्स शुल्काबाबतचे वाद कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

पाणीपट्टीच्या आकारणीतही बदल करण्यात आला आहे. आता प्रत्येक घरातील नळांच्या संख्येनुसार पाणीपट्टी निश्चित केली जाणार आहे. यामुळे पाण्याचा वापर अधिक जबाबदारीने होईल आणि पाण्याचा अपव्यय कमी करण्यास मदत होईल, असा सरकारचा विश्वास आहे.

 

थकीत मेंटेनन्सवर आकारल्या जाणाऱ्या व्याजदरातही कपात करण्यात आली आहे. यापूर्वी काही सोसायट्यांमध्ये थकबाकीवर २१ टक्क्यांपर्यंत व्याज आकारले जात होते. आता हा कमाल व्याजदर १२ टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकीदार सदस्यांवरील अतिरिक्त आर्थिक भार कमी होणार आहे.

नवीन गृहनिर्माण संस्थांच्या नोंदणी प्रक्रियेलाही अधिक वेग देण्यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. सोसायटीचे नाव आरक्षित करून बँक खाते उघडल्यानंतर दोन महिन्यांच्या आत नोंदणीसाठी अर्ज करणे आवश्यक असेल. तसेच अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत संबंधित अधिकाऱ्यांना निर्णय देणे बंधनकारक राहणार आहे.

याशिवाय, सोसायटीचे सदस्यत्व मिळवण्यासाठी आता नोंदणीकृत विक्री करार (Registered Sale Agreement) किंवा इतर वैध कायदेशीर कागदपत्रे पुरेशी ठरणार आहेत. तसेच मालमत्ता कर, लिफ्ट देखभाल खर्च, पार्किंग शुल्क, विमा आणि नॉन-ऑक्युपन्सी शुल्काबाबतही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो फ्लॅटधारकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49
Next Post

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप......

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.