Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 5 July 2026, 16:33

पुणे: पुण्यातील बुधवार पेठ परिसरात दोन तरुणांना गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून २ हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी दोन पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गुन्हा दाखल होताच संबंधित दोन्ही पोलीस कर्मचारी फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.

या प्रकरणातील आरोपी पोलीस अंमलदार विवेक पाटील आणि राहुल दाभाडे अशी आहेत. दोघेही गेल्या वर्षभरापासून फरासखाना पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

याप्रकरणी हडपसरमधील तुपेवस्ती येथे राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणाने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना २९ जून रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता बुधवार पेठेतील एटीएम गल्ली परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्याचा मित्र बुधवार पेठ परिसरात फिरत असताना विवेक पाटील आणि राहुल दाभाडे यांनी त्यांना अडवले. “येथे काय करता?” अशी विचारणा करून त्यांना गुन्हा दाखल होईल आणि कोर्टात जावे लागेल, अशी भीती दाखवण्यात आली. त्यानंतर दोघांकडून त्यांच्या इच्छेविरुद्ध एका महिलेच्या नावावर असलेल्या स्कॅनरवर २ हजार रुपये ऑनलाइन भरून घेण्यात आले.

 

घटनेनंतर भीतीपोटी दोन्ही तरुणांनी याबाबत कोणाकडेही तक्रार केली नव्हती. मात्र, या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने त्याची दखल घेतली. त्यानंतर संबंधित तरुणांचा शोध घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत दोन्ही पोलिसांनी पैसे घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाची माहिती देताना पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी व्हिडिओच्या आधारे संपूर्ण प्रकार समोर आल्याचे सांगितले. सध्या आरोपी पोलिसांचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील करत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील खोलीत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; तरुणाला अटक

Friday, 25 September 2026, 22:45

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

Friday, 25 September 2026, 22:10

अन् तिने पैशांसाठी स्वतःच्या लेकराला विकलं! लिव्ह-इन रिलेशनशिपमधून गरोदर राहिली अन् दारुड्या बॉयफ्रेंडला कंटाळून बाळाचा सौदा

Friday, 25 September 2026, 21:37

शिरूर पूर्वभागात डीजेच्या दणदणाटाला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांकडून कौतुक

Friday, 25 September 2026, 21:16

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01

‘तिच्यासोबतचे संबंध तोड’ रिक्षाचालकाला वारंवार बजावलं अन् नंतर खुनाचा थरार; कारखाली चिरडण्याचा प्रयत्न, पाईपने डोक्यावर हल्ला अन्…

Friday, 25 September 2026, 20:51
Next Post

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp