उरुळी कांचन, (पुणे) : शिंदवणे ते जेजुरी या राज्यमार्गावरील अनधिकृत फ्लेक्स तात्काळ काढून घेण्यात यावे, अशी मागणी शिंदवणे (ता. हवेली) येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश शितोळे यांनी ग्रामपंचायतीला लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनानुसार, शिंदवणे रोड हा राज्यमार्ग असून या रोडवरून सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहनांची मोठी वर्दळ असते. सध्या पावसाचे दिवस असून वाऱ्यामुळे रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेले अनधिकृत फ्लेक्स रस्त्यावर पडत आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे हे फ्लेक्स कोणाच्या सहमतीने लावण्यात आले आहेत. त्यांची ग्रामपंचायतीने चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, पीएमआरडीए चा कर ग्रामपंचायतची परवानगी व जागा मालकाची परवानगी आहे का हे ग्रामपंचायतीने पाहावे. लावलेले फ्लेक्स हे अत्यंत कमकुवत असून वारे आल्यानंतर रस्त्यावर पडतात. यामुळे एखादी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे फ्लेक्स कोणाच्या सहमतीने लावण्यात आले, याची चौकशी करण्यात यावी. अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.