शिरुर : शिरूर तालुक्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांच्या तपास यंत्रणेमुळे संशयित दोन चोरट्यांना ताब्यात घेऊन चोकशी केली असता त्यांच्याकडे पाच चोरीच्या दुचाकी आढळून आल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व शिरूर पोलिस स्टेशन यांनी मोबाईल चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी शिरीष सोपान जाधव (वय १९. रा. होलार आळी, शिरूर) व संतोष मारूती ढोबळे (वय १९, रा. वाडा कॅालनी, शिरूर) यांच्याकडे मोटारसायकल चोरीच्या अनुषंगाने कसून तपास केला. त्यावेळी रांजणगाव एमआयडीसीतील तसेच पारनेर भागातील चार मोटार सायकल व होंडा कंपनीची एक मोटार सायकल अशा पाच मोटार सायकल चोरी केल्याचे तपासात सांगितले. त्यांच्याकडून पाचही दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.