Wednesday, June 11, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामती शहरामध्ये बेकायदेशीरपणे शरीरास घातक असलेले इंजेक्शन विकणाऱ्या इसमांना अटक

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 23 April 2024, 9:57
two people arrested for selling harmful injection in baramati

बारामती, (पुणे) : हृदयविकाराच्या आजारामध्ये वापरले जाणारे व मानवी शरीरास घातक असलेले मिफेनटरमीन इंजेक्शन विक्री करण्यासाठी आलेल्यादोघांना बारामती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर इंजेक्शन हे तरुण मुले व्यायाम करुन बॉडी बिल्डींगसाठी व व्यसन म्हणून घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच या इंजेक्शनमुळे कायमस्वरुपी तंद्री लागणे, ब्लड प्रेशर जास्त राहणे, किडनी निकामी होणे असे दुष्परिणाम होत आहेत.

याप्रकरणी बारामती पोलिसांनी अभय सम्राट जाधव (वय २२, रा. श्रीरामनगर कसबा, बारामती ता. बारामती) व श्रीकांत अर्जुन घुले (वय २३, रा. खताळपट्टा ता. बारामती) या दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ६० इंजेक्शन जप्त केले आहेत.

बारामती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. २१) बारामती शहर पोलीस पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचे पथक गस्त घालीत असताना पिंपळी गावाच्या हद्यीमध्ये कॅनॉललगत अंधारामध्ये दोन इसम एका चारचाकी गाडीत बसलेले दिसून आले. त्यांचे नाव व पत्ता विचारता त्यांनी वरीलप्रमाणे सांगितले.

दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय आल्याने त्यांची अंगझडती तसेच त्यांच्या कारची झडती घेतली असता त्यामध्ये मिफेनटरमीन हे मानवी शरीरास घातक असलेले ६० इंजेक्शन मिळून आले. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके हे करीत आहेत.

दरम्यान, याबाबत अन्न व औषध विभागाचे औषध निरीक्षक सचिन बुगड यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे भेट देऊन सदर इंजेक्शनचा उपयोग हृदयविकाराच्या आजारामध्ये केला जातो. परंतु, सध्या सदर इंजेक्शनचा उपयोग तरुण मुले व्यायाम करुन बॉडी बिल्डींगसाठी व व्यसन म्हणून करत असल्याचे सांगितले. तसेच सदर इंजेक्शनमुळे कायमस्वरुपी तंद्री लागणे, ब्लड प्रेशर जास्त राहणे, किडनी निकामी होणे असे दुष्परिणाम होत आहे.

पोलीस निरीक्षक संतोष घोळवे याबाबत बोलताना म्हणाले, “अशा प्रकारचे शरीरास घातक असणारे इंजेक्शन घेवून स्वतः च्या आरोग्याची तसेच शरीराचे अवयव कायमस्वरुपी निकामी करुन घेण्याऐवजी पारंपरिक व्यायाम करुन शरीरयष्टी कमविण्याकडे तरुणांनी भर द्यावा.”

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, अभिजित कांबळे, अक्षय सिताप, दशरथ इंगोले, सागर जामदार, दादासाहेब जाधव, विशाल शिंदे, गौरव ठोंबरे यांनी केली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयात दाखले प्रलंबित; ४,८६२ अर्ज रखडले, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय

Tuesday, 10 June 2025, 22:59

महाराष्ट्र सरकारकडून नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी

Tuesday, 10 June 2025, 22:39

सुशील हगवणेला अटक, न्यायालयीन कोठडी नंतर जामिनावर मुक्तता; शस्त्र परवान्यासाठी बनावट भाडेकरार प्रकरणात कोथरूड पोलिसांची कारवाई

Tuesday, 10 June 2025, 22:15

तुझी नोकरी अन् आयुष्य उध्वस्त करून टाकू! पोलीस निरीक्षक, कॉन्स्टेबलची कर्मचारी पोलीस हवालदाराला धमकी, कर्मचारी हवालदार बेपत्ता

Tuesday, 10 June 2025, 21:55

सरपंच निर्मला नवले यांनी अशी साजरी केली वटपौर्णिमा; फोटोज होताय व्हायरल, सोशल मीडियावर मिळतोय प्रचंड प्रतिसाद

Tuesday, 10 June 2025, 21:13

धक्कादायक..! लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध; २० वर्षीय तरुणी निघाली ५ महिण्याची गर्भवती; परिसरात खळबळ

Tuesday, 10 June 2025, 21:01
Next Post
Pune gramin police review of sensitive voting centers

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक बंदोबस्त; १८ मतदान केंद्र संवेदनशील

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.