पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज २१ नोव्हेंबर रोजी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम अंतर्गत पुणे वाहिनीवर (कि.मी. ३५/५००) येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. त्यामुळे आज दुपारी १२ ते २ या दोन तासांच्या वेळेत ब्लॉक घेण्यात आला आहे.
या वेळी मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आली आहे. तसेच, दुपारी 2 वाजल्यानंतर पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा पूर्ववत होणार असल्याचीही माहितीही देण्यात आली आहे. (MSRDC)
ब्लॉकदरम्यान वाहतुकीत असे असतील बदल
आज दुपारी मुंबई – पुणे द्रुतगती मगामार्गावरील ब्लॉकदरम्यान मुंबईकडून पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. तसेच, यादरम्यान मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या हलक्या वाहानांची वाहतूक (कि.मी. ०८/२०० येथील) शेडुंग फाटा येथून वळवली जाणार असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 जुना मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील शिंग्रोबा घाटातून द्रुतगती मार्गाच्या मॅजिक पॉईंट (कि.मी. ४२/१००) येथे पुन्हा मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर मार्गस्थ करण्यात येणार आहे. गँट्री बसवण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच, दुपारी 2 नंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्ववत केली जाईल. अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.(Mumbai-Pune Expressway)