Two Children Drowned : कोरेगाव भीमा : खडकवासला धरणात नऊ मुली बुडल्याची बातमी ताजी असताना आता पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील भीमा नदीत दोन मुले बुडाल्याची बातमी समोर आली आहे. भीमा नदीत आज दुपारी दिडच्या सुमारास पोहण्यासाठी गेली असता ही मुली बुडाली आहेत. (Two children drowned in Bhima river in Koregaon Bhima)
दोघेही कोरेगाव भीमा येथील ढेरंगे वस्तीतील
गौरव गुरुलिंग स्वामी (वय १६) व अनुराग विजय मांदळे (वय १६) अशी पाण्यात बुडालेल्या मुलांची नावे आहेत. दोघेही शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील ढेरंगे वस्तीतील आहेत. (Two Children Drowned )
मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा येथील भीमा नदीत ढेरंगे वस्तीतील पाच ते सहा मुले पोहण्यासाठी गेली होती. ही मुले पाण्यात पोहत असताना त्यातील गौरव व अनुराग अचानक गायब झाले. (Two Children Drowned ) त्यानंतर इतर पाण्यातील मुलांनी याबाबत माहिती देण्यासाठी गावात धाव घेतली व येथील ग्रामस्थांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेत पाण्यात उतरून गौरव व अनुरागला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये गावकऱ्यांना यश आले नाही.
दरम्यान, घटनेची माहीती मिळताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान, रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. घटनास्थळी दुपारी चार वाजल्यापासून अग्निशमन दलाचे जवान पाण्यात मुलांचा शोध घेण्यास उतरले. (Two Children Drowned ) अद्याप त्यांचा शोध सुरु आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
A Devotee Drowned In A Dam At Jejuri : खंडोबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा धरणात बुडून मृत्यू