शिरूर : शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे येथील रशीद गुलाब शेख या शेतकऱ्याच्या दोन म्हशींना तुटलेल्या विजेच्या तारांचा धक्का लागल्याने त्या जागीच ठार झाल्या.
महावितरण कंपनीने शेतकऱ्याला त्वरीत नुकसान भरपाई द्यावी तसेच तत्काळ परिसरातील विजेचे खांब, तारा दुरूस्ती करण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे यांनी केले. याबाबत महसूल विभागाला पंचनामा करण्याचे आदेश तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिले आहेत.