पुणे : जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी जिल्ह्यातील नऊ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. नव्याने आलेल्या पाच पोलिस निरीक्षकांना नेमणुका देण्यात आल्या आहेत. तर तीन सहायक पोलिस निरीक्षकांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. बारामती शहर आणि बारामती तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संतोष घोळवे व गोरख गायकवाड यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी एका परिपत्रकाद्वारे नवीन अधिका-यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.
प्रशासकीय कारणास्तव पोलिस निरीक्षकांच्या केलेल्या बदल्या पुढीलप्रमाणे :
(कोठून कुठे)
- प्रभाकर माधवराव मोरे (परकीय नागरिक नोंदणी कक्ष ते खेड)
- दिनेश सखाराम तायडे (पोलिस उपमुख्यालय ब-हाणपूर, बारामती ते आळेफाटा)
- संतोष शामराव जाधव (नियंत्रण कक्ष ते जिल्हा वाहतूक शाखा)
- अभिजित सुभाष देशमुख (जिल्हा विशेष शाखा ते परकीय नागरिक नोंदणी कक्ष)
- गोरख कृष्णा गायकवाड (बारामती तालुका ते नियंत्रण कक्ष)
- संतोष दत्तात्रय गिरीगोसावी (जिल्हा वाहतूक शाखा ते पौड)
- अरुण ज्ञानदेव फुगे (मंचर ते नियंत्रण कक्ष)
- संतोष श्रीमंत घोळवे (बारामती शहर ते नियंत्रण कक्ष)
- ज्योतीराम माणिक गुंजवटे (शिरूर ते नियंत्रण कक्ष)
नव्याने हजर झालेल्या पोलिस निरीक्षकांना मिळालेल्या नेमणुका :
- श्रीकांत चंद्रकांत कंकाळ (मंचर)
- विलास किसन नाळे (बारामती शहर)
- विश्वास सुभाष जाधव (बारामती तालुका)
- संदेश अरुण केंजळे (शिरूर)
- राजेश नारायणराव रामाघरे (आर्थिक गुन्हे शाखा)
सहायक पोलिस निरीक्षकांच्या विनंती बदल्या पुढीलप्रमाणे :
- राजकुमार काशिनाथ डुणगे (इंदापूर ते वालचंदनगर)
- सचिन नाथाराम लोखंडे (आर्थिक गुन्हे शाखा ते माळेगाव)
- मनोजकुमार सुभाषराव नवसरे (रांजणगाव ते सुपा