पुणे : राज्याच्या गृह विभागाने तब्बल ४४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांची तर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना पदोन्नती देत त्यांच्याकडे होमगार्डचे महासमादेश म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश पारित केले आहेत. त्यानुसार नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांची गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक असलेले पंकज देशमुख आता पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार स्विकारणार आहेत. नागरी संरक्षण व गृहरक्षक दलाचे अतिरिकत् नियंत्रक संजय जाधव बारामती विभागाचे नवीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार स्विकारणार आहेत.
बदलीमध्ये ‘या’ अधिकाऱ्यांचा समावेश
रितेश कुमार, अमितेश कुमार, प्रभात कुमार, रविंद्र कुमार सिंगल, शिरीष जैन, दीपक पांडे, दत्तात्रय कराळे, संजय शिंदे, प्रवीण कुमार, प्रवणीकुमार पडवळ, संजय दराडे, ज्ञानेश्वर चव्हाण, एस. डी. एनपुरे, एन.डी. रेड्डी, संदीप पाटील, विरेंद्र मिश्रा, रंजन कुमार शर्मा, नामदेव चव्हाण, राजेंद्र माने, विनिता साहु, एम. राजकुमार, अंकित गोयल, बसवराज तेली, शैलेश बलकवडे, शहाजी उमाप, एस.जी. दिवाण, संजय शिंत्रे, मनोज पाटील,, विक्रम देशमाने, पंकज देशमुख, एमसीव्ही महेश्वर रेड्डी, अजय कुमार बन्सल, रविंद्रसिंह परदेशी, रागसुधा आर., संदीप घुगे, मुमक्का सुदर्शन, धोंडोपंत स्वामी, पंकज कुमावत, मितेष घट्टे, विक्रम साळी, आनंद भोईटे, संदीप पखाले, रमेश धुमाळ व समाधान पवार यांचा समावेश आहे. बी.जी. शेखर यांची विशेष पोलिस महानिरीक्षक (नाशिक परिक्षेत्र) म्हणून बदली झाली आहे.