लोणी काळभोर : वेळ सायंकाळ चारची… आळंदी म्हातोबाची रेल्वे स्थानकावरील रेल्वेला आज बुधवारी (ता.२०) सायंकाळ चार वाजण्याच्या सुमारास आग लागते…पाहता पाहता धुराचे मोठ-मोठाले लोळ दूरवर पसरतात…रेल्वे स्थानकावर धोक्याची घंटा वाजविली जाते…रेल्वे कर्मचाऱ्यांची धावपळ सुरु होते…त्यानंतर या घटनेची माहिती पोलीस प्रशासन, अग्निशामक दल, आरोग्य सेवा यांना ताबडतोब देण्यात येते…या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस, एमआरडीए, पुणे शहर अग्निशामक दल व रुग्णवाहिका त्वरित घटनास्थळी दाखल होतात…
आगीत अडकलेल्या रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु होते…काही जवान आग विझविण्याचा प्रयत्न सुरू असतो…आळंदी म्हातोबाची रेल्वे स्थानकावर अचानक पोलीस यंत्रणा व अन्य यंत्रणा आल्याने काही काळ नागरिकही घाबरले होते…हा सर्व थरार पाहण्यासाठी रस्त्यावर मात्र बघ्यांची तोबा गर्दी उसळते… पाहता पाहता आगीच्या या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरते…सर्वांच्या मोबाइलमध्ये फोटो अन् घटनेचे अपडेट्स येतात… मात्र, दीड तासाने सर्वांना हा मॉक ड्रिल असल्याचे समजताच घटना पाहणारे दर्दी आणि फोटो घेणारे मोबाईल बहाद्दर डोक्याला हात लावून पळ काढतात…
यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ३ वाजून ५२ मिनिटाच्या सुमारास मदतीचा कॉल आला. तेव्हा लोणी काळभोरचे बीट मार्शल शिवाजी दरेकर व सोमनाथ गळाकाटे अवघ्या १४ मिनिटाच्या आत मदतीसाठी मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनतर मॉक ड्रिलची माहिती पोलीस ठाण्यात कळविली. तेव्हा पोलिसांची धावपळ थांबवली. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या आल्या होत्या. जवानांनी रेल्वेला लागलेली आग विझविली. यासाठी
अग्निशमन दलाचे वाहन चालक चंद्रकांत जगताप, अतपाफ पटेल, तांडेल संजय जाधव, फायरमन सचिन गवळी, अभिजित दराडे, संदीप तांबे, रिझवान फरास फायरमन दत्तात्रय माने आणि मदतनीस भास्कर घुले यांनी मदत केली.
दरम्यान, प्रत्यक्षात रेल्वेला खरीच आग लागल्यास त्यास कसे सामोरे जावे, काय-काय खबरदारी घ्यावी. कोणी काय जबाबदारी पार पाडावी, याची रंगीत तालीम म्हणजेच हे मॉक ड्रिल होय. रेल्वे प्रशासनाने मॉक ड्रिलच्या माध्यमातून अग्निसुरक्षेसंदर्भात जनजागृती केली आहे. Train fire at