लोणी काळभोर, (पुणे) : पुणे -सोलापूर महामार्गावर थेऊर फाट्यावर पुण्याच्या बाजूकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. कात्रजच्या मुख्य चौकातील उड्डाणपुलाचे सेगमेंटल लॉचिंगचे काम सुरु होणार असल्याने कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना नवले पूल येथे प्रवेश बंद करण्यात आला असल्याचे वाहतुक पोलिसांकडून वाहतूक थेऊर फाट्यावरून वळण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
हि वाहूतक थेऊर फाट्यावरून पुढे सोडली जात आहे. त्यामुळे लोणी काळभोर, फुरसुंगी वडकी, उरुळी देवाची व कदमवाकवस्ती, परिसरात मोठमोठी गोडाऊन असल्याने या परिसरातील वाहनांही या परिसरात जाण्यासाठी पोलिसांकडून जाऊ दिले जात नाही. त्यामुळे वाहतूककोंडी बरोबरच चालकांना थेऊर, कोलवडी परिसरातून फिरून यावे लागत आहे. त्यामुळे चालकांसह परिसरातील नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
ज्या गाड्या कदमवाकवस्ती, शेवाळवाडी येथून पुढे जाणार आहेत. त्या अवजड वाहनांना हडपसर येथील चौकात थांबून दिवे घाटातून पुढे जाऊ द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांसह चालकांकडून करण्यात येत आहे. (डंपर, हायवा, मिक्सर, हेवी मोटर व्हेईकल्स, हेवी गुड्स मोटार व्हेईकल्स, हेवी ट्रान्सपोर्ट व्हेईकल, ट्रेलर्स, कंटेनर्स, मल्टी अॅक्सल वाहने) अशा वाहनांना बंदी करण्यात आली आहे.
याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते व कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तात्या तुपे म्हणाले, “वाहतूक पोलिसांनी थेऊर फाट्यावर गाड्या अडविल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली झाली आहे. फुरसुंगी वडकी, उरुळी देवाची या परिसरात जाणाऱ्या गोडावूनला जाणाऱ्या वाहनांना न सोडल्याने कोंडी होत आहे. या परिसरात जाणाऱ्या गाड्या सोडण्यात याव्यात. तसेच पुढे जाणाऱ्या गाड्या हडपसर येथून सोडू नका, त्या दिवे घाटातून पुढे पाठवाव्या.”
याबाबत बोलताना लोणी काळभोर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र पवार म्हणाले, “उड्डाणपुलाच्या मुख्य चौकातील सेगमेंटल लॉचिंगचे काम सुरु होणार असल्याने वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी पत्र काढले आहे. हे बदल 3 डिसेंबरपासून प्रायोगिक तत्वावर पुढील आदेश येईपर्यंत लागू करण्यात आले आहेत. ज्या वाहन चालकांना लोणी काळभोर, फुरसुंगी वडकी, उरुळी देवाची व कदमवाकवस्तीतील गोडावूनला जायचे आहे. त्यांनी रात्री 10 ते पहाटे 4 या वेळत जावे. व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.