पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर जांभुळवाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे बाह्यवळण मार्गावरील जांभुळवाडी पूल परिसरातील मुंबईकडे जणारी एक मार्गिका १० फेब्रुवारीपर्यंत वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. उर्वरित दोन मार्गिकेवरुन वाहतूक सुरळीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.
दरम्यान, बाह्यवळण मार्गावरील जांभुळवाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. जांभुळवाडी पूल परिसरातील मुंबईकडे जाणारी एक मार्गिका वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार असून, उर्वरित दोन मार्गिकेवरून वाहतूक सुरळीत ठेवण्यात येणार आहे. १० फेब्रुवारीपर्यंत या भागात वाहतूक बदल करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी सांगितले आहे.