दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर, (पुणे) : येथील वीरश्री मालोजीराजे यांच्या ऐतिहासिक गढीचे संवर्धन (Veerashree Malojiraje and the construction) व स्मारक उभारणेसाठी सविस्तर अंदाजपत्रक व आराखडे तयार करून पर्यटन संचालनालयाकडे (Directorate of Tourism immediately) तत्काळ पाठवावे. या आशयाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना (District Collector) पाठविले असल्याची माहिती माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील ( Harsh Vardhan Patil ) यांनी दिली. (indapur news)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हर्षवर्धन पाटील यांनी २५ मार्च २०२३ रोजी मुंबईत भेट घेऊन इंदापूर येथील वीरश्री मालोजीराजे यांच्या ऐतिहासिक गढीचे संवर्धन व स्मारक उभारणेसाठी चर्चा केली आणि पत्र दिले. त्यानुसार शासनाने संचालक पर्यटन संचालनालय महाराष्ट्र राज्य यांना १५ एप्रिल २०२३ रोजी पत्र पाठवून या संदर्भातील सविस्तर अहवाल शासनास तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार राज्याचे सहाय्यक संचालक पर्यटन यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून वीरश्री मालोजीराजे यांच्या ऐतिहासिक गढीचे संवर्धन व स्मारक उभारणेसाठी सविस्तर अंदाजपत्रक, आराखडे पर्यटन विभागाकडे सादर करण्याचे पत्र पाठविले आहे. पत्राची एक प्रत जिल्हा नियोजन अधिकारी पुणे यांनाही पर्यटन विभागाने पाठविली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे वास्तव्य असलेल्या गढीचे संवर्धन व स्मारकासाठी लागेल तेवढा निधी देण्यास शिवसेना-भाजप सरकार कटिबद्ध असल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री मंगलप्रसाद लोढा, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे वीरश्री मालोजीराजे यांच्या ऐतिहासिक गढीचे संवर्धन व स्मारक उभारणेसाठी सातत्याने सहकार्य करीत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Harshvardhan Patil : इंदापूर तालुक्यात विरोधकांकडून नवा ट्रेण्ड माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
Harshvardhan Patil | इंदापूर तालुक्यातील सर्वधर्मसमभाव राज्यात आदर्शवत हर्षवर्धन पाटील
Harshvardhan Patil : भाजपच्या नेतृत्वाखाली देश, राज्य प्रगतीपथावर- हर्षवर्धन पाटील