पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी पुण्यात सगळीकडे जोरदार तयारी सुरु झाली. दोन वर्षांनी मोठ्या उत्साहात थर्टी फर्स्ट जोमात साजरा करण्यासाठी पुणेकर तयार आहेत. याच उत्साहाला गालबोट लागू नये म्हणून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ३१ डिसेंबरला रात्री सुमारे तीन हजार पोलीस तैनात असणार आहेत. त्यामुळे सगळीकडे पोलिसांची करडी नजर असणार आहे.
तरुणाईकडून ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी होणारी गर्दी पाहता शहर पोलिस दलातील सुमारे तीन हजार पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांचा कडक बंदोबस्त रस्त्यावर असणार आहे. विविध रेस्टॉरंट आणि खासगी रिसॉर्टमध्ये अनेकांनी पार्टी आणि सेलिब्रेशनचं नियोजन केलं आहे. याशिवाय पुण्यातील अनेक रस्त्यांवर तरुणाई गर्दी करते.
तसेच ठिकठिकाणी नाकाबंदी करून गुन्हेगारांवर लक्ष ठेवले जाईल. त्याचबरोबर ड्रंक ॲण्ड ड्राइव्हच्या कारवाई होतील. यात ब्रिथ ॲनलायझरचा वापर करण्यात येणार आहे. प्रमुख मार्गांवर नाकाबंदी ‘थर्टी फस्ट’च्या रात्री विविध भागांतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
शहरातून बाहेर जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करण्यात येणार आहे. नागरिकांना आक्षेपार्ह घटना अथवा काही संशय असल्यास 26126296, 8975953100 किंवा 112 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.
यंदा ३१ साजरा डिसेंबर करण्यासाठी मोठी मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे हुल्लडबाजी करणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात येणार आहे. शहरात ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याने तरुणांना गाडी चालवताना काळजी घ्यावी लागणार आहे.