पुणे : पुण्यातील मोहम्मद वाडी येथून ऐन दिवाळीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाने सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना मोहम्मदवाडी परिसरातील कृष्णा नगर येथे घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात 13 वर्षीय मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. दरम्यान आरोपी मुलाच्या पालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. ( Rape Case)
अधिक माहिती अशी की, आरोपी मुलगा हा पीडित मुलीच्या घराच्या शेजारीच राहायला आहे. पीडित मुलगी अवघी सहा वर्षांची असून ती आरोपीच्या घरी खेळण्यासाठी गेली असता आरोपीने तिचे कपडे काडून तिच्यावर बलात्कार केला. हा सर्व प्रकार पीडित मुलीच्या लहान भावाने पहिला आणि त्यांनी घरी जाऊन या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर या मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.