बारामती : बारामती शहरात एका ३० वर्षीय महिलेला रस्त्याने वॉक करणे चांगलेच महागात पडले आहे. ती लघुशंकेसाठी उसाच्या पिकात गेली असताना तिघांनी तिला चाकूचा धाक दाखवत तिच्याकडील १ लाख ५ हजार रुपयांचे दागिने लुटल्याची घटना घडली आहे. याशिवाय तिला अंगावरील कपडे उतरवायला लावत तिची अर्धन्य अवस्थेतील फोटो काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी (दि. २४) सायंकाळी सातच्या सुमारास वंजारवाडी चौकातील उणपुलाजवळ घडली.
याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तिघा अज्ञातांविरोधात विनयभंगासह जबरी चोरी व अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० वर्षीय विवाहित महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर वंजारवाड़ी चौकातील उणपुलाजवळ ही महिला तासभर वॉक करत होती. त्या वेळी दुभाजकाजवळ एकजण फोनवर बोलत होती. त्यानंतर लघुशंकेसाठी ही महिला उसाच्या शेतात गेली. त्या वेळी अनोळखी एकजण तिच्या मागे तेथे आला. त्याने चाकू काढत तिच्या गळ्याला लावत गळ्यातील काढ, अशी धमकी दिली. त्याला घाबरून तिने थांब काढून देते, असे सांगितले.
तेवढ्यात आणखी दोन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आले. त्यातील एकाने तिचे तोंड दाबून तिचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. तिला तेथून थोड्या अंतरावरील विहिरीच्या कडेला असलेल्या उसाच्या पिकात नेण्यात आले. तेथे चाकूचा धाक दाखवत तिच्याकडील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील टॉप्स, सोन्याची अंगठी असे १ लाख ५ हजारांचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले.
एवढाच नाही तर, चाकू हातात असलेल्या युवकाने तिला कपडे काढण्यास सांगितले. तिने नकार दिला असता त्यांनी तिची ओडणी काढून बाजूला फेकून दिली. तिच्या अंगावरील टॉप फाडून काढला. तिच्या अंगातील लेगिज पॅण्ट जबदस्तीने काढून फेकून दिली, त्यातील एकाने तिचे अर्धन्या अवस्थेतील फोटो काढत तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपस बारामती पोलीस करत आहेत.