Theur News : लोणी काळभोर, (पुणे) : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सभासद शेतक-यांनी पुढाकार घेतला असून यासाठी आतापर्यंत चार गटांमध्ये चार बैठका झाल्या आहेत. उर्वरित दोन गटांमध्ये ही लवकरच बैठका होणार असून कारखान्याची आगामी निवडणूक बिनविरोध करावी असाही सभासदांचा आग्रह आहे. (Member farmers took initiative for revival of Yashwant factory at Theur; Members urged to hold the upcoming election uncontested.)
माजी संचालक पांडुरंग काळे यांचा पुढाकार
कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे यांनी या संदर्भात पुढाकार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्याला भेट दिली होती. त्या नंतर ११ मार्च २०२३ रोजी एक विशेष सर्वसाधारण सभा झाली होती. (Theur News) या सभेत यशवंत सुरू करण्यासाठी कारखान्याची कोणतीही मालमत्ता भाड्याने न देता अथवा न विकता तातडीने संचालक मंडळाची निवडणूक घेऊन सर्व अडचणी सोडवण्याचा प्रयत्न लोकनियुक्त संचालक मंडळाने करावा असा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला होता. त्यानुसार साखर आयुक्तांना निवडणूक खर्चासाठी ३० लाख रुपयांचा धनादेश कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे व त्यांच्या सहका-यांनी दिला आहे.
यशवंतच्या ताळेबंदात रक्कम शिल्लक नसल्याने निवडणूकीसाठी शेतक-यांनी निधी उभारावा या आवाहनानुसार सभासदांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. निवडणूक होईपर्यंत सदर रक्कम डिपॉझिट म्हणून राहणार आहे. कारखाना सभासदांच्या ताब्यात गेलेनंतर किरकोळ व्याजासह नवीन संचालक मंडळाने ही रक्कम परत करण्याचे ठरले आहे. (Theur News) आता निवडणूक प्राधिकरणास पत्र देऊन निवडणूक कार्यवाही सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तत्काळ पाठवण्यात येणार आहे.
आगामी काळात यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक होणार असून त्यानंतर सभासद नियुक्त संचालक मंडळाने कारभार हाती घेईल. त्यानंतर कारखाना सुरू करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करणार आहे. यशवंत सहकारी साखर कारखाना आर्थिक अनियमितेमुळे बारा वर्षांपूर्वी बंद पडला. हा कारखाना चालू व्हावा यासाठी अनेक प्रयत्न झाले. (Theur News) अनेक निवडणुका लढल्या गेल्या, परंतु कारखाना आजपर्यंत चालू होऊ शकला नाही. हा कारखाना चालू व्हावा यासाठी प्रतिनिधींनी एकत्र येऊन बैठका घेण्यास सुरुवात केली असून यासाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही चित्र दिसत आहे.
नुकतीच गट क्रमांक चार मधील सभासदांची बैठक पार पडली. मांजरी बुद्रुक येथील के के घुले विद्यालयात कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात गट क्र. ४ (फुरसुंगी, मांजरी व हडपसर) मधील सभासदांची बैठक पार पडली. (Theur News) यावेळी कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात एकमताने संमती देण्यात आली. माजी संचालक पांडुरंग काळे यांनी निवडणूक घेण्यासंदर्भात तीस लाख रुपयांचा जो निधी कारखाना खात्यामध्ये जमा केला.
त्या संदर्भात सर्व उपस्थित सभासदांनी त्यांचे आभार मानले. यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात जो अतिरिक्त निधी लागणार आहे. त्या संदर्भात चर्चा झाल्यानंतर लगेच मांजरीचे माजी सरपंच शिवराज घुले, व मल्हार कुंजीर यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश पांडुरंग काळे यांच्याकडे सुपूर्द केला.(Theur News) दिलीप तुपे, सुरेश घुले, राजीव शिवाजीराव घुले, अॅड. शहाजी मगर, निलेश मगर, प्रदीप मगर यांनी प्रत्येकी एक लाख रुपये देण्याचे जाहीर केले तर संपूर्ण फुरसुंगी गावाच्या वतीने तीन लाख असा एकूण ११ लाख रुपयांच्या निधी देण्यात येईल असे यावेळी जाहीर करण्यात आले.
दरम्यान, या बैठकीस गोपाळ म्हस्के, अनिल तुपे, नंदू घुले, शिवाजी कामठे, गेनबा खुटवड, दिनकर हरपळे, अनिल टिळेकर, राहुल चोरघडे, युवराज शेवाळे, मधुकर घुले, रमेश ढोरे, डॉ. शिवदीप उंद्रे, शैलेश बेल्हेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन रंगनाथ कड यांनी (Theur News) तर उपस्थितांचे आभार लोणी काळभोरचे माजी उपसरपंच अण्णासाहेब गणपत काळभोर यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Theur News : थेऊर येथील कुंजीर पाणीपुरवठा योजेनेचे अध्यक्ष सुखराज कुंजीर यांना मातृशोक..
Theur News : थेऊरच्या ऐश्वर्या डोखळे – कुंजीर बनल्या नगररचना अधिकारी