Theur News : लोणी काळभोर, (पुणे) : अष्टविनायक तीर्थ क्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथे संकष्टी चतुर्थीला बुधवारी (ता.० ७) चिंतामणीच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा लागल्या आहेत. मंदिर परिसराला कडक उन्हातही यात्रेचे स्वरूप आले. (Flower decorations to ‘Chintamani’ at Theur; A large crowd of devotees on the occasion of Sankashti Chaturthi…)
सकाळपासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आनंद तांबे यांनी सांगितले की, संकष्टी चतुर्थी असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात चिंतामणीच्या दर्शनासाठी दाखल झाले. मंगलमुर्ती आगलावे यांच्या हस्ते पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ‘श्रीं’ ची पूजा केली (Theur News) तर चिंचवड देवस्थान ट्रस्च्या वतीने महापूजा करून सकाळी सहा वाजल्यापासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले.
चिंतामणी गणपती मंदिर परिसरात गावठी भाज्या, फळे, कैरी, कोकम, विविध प्रकारचे पेरू, तसेच नारळ, दुर्वा विकण्यासाठी महिला विक्रेत्या व नागरिक बसले होते.
यावेळी येणारे भाविक आवर्जून ते खरेदी करताना दिसून येत होते. (Theur News) मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले होते. परिसरातील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, हार, फुल व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले आदी विक्रेते दिसून येत होते. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांसह विक्रेत्यांची मोठी वर्दळ पहायला मिळत होती.
दरम्यान, सायंकाळी ह.भ.प. संतोशानंद शास्त्री यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. (Theur News) तसेच चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना काढण्यात येणार आहे. उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.
याबाबत बोलताना चिंचवड देवस्थानचे विश्वस्त आनंद महाराज तांबे म्हणाले, “संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात विविध प्रकारची फुले वापरून आकर्षक रांगोळी, फुलांची आरास, पायघड्या घालण्यात आल्या होत्या. वाढलेल्या उन्हामुळे सावलीसाठी मंडप व्यवस्था तसेच भाविकांसाठी स्वच्छता ग्रहाची सोय करण्यात आली होती तर उन्हाचा त्रास कमी व्हावा यासाठी मंदिर परिसरात जाळी लावण्यात आली होती. (Theur News) चिंचवड देवस्थानमार्फत भाविकांना उपवासाची खिचडीचे वाटप करण्यात आले होते.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Theur News : थेऊर येथील कुंजीर पाणीपुरवठा योजेनेचे अध्यक्ष सुखराज कुंजीर यांना मातृशोक..
Theur News : थेऊरच्या ऐश्वर्या डोखळे – कुंजीर बनल्या नगररचना अधिकारी