Theur News : लोणी काळभोर, (पुणे) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या नगर रचना अधिकारी पदाच्या परीक्षेत थेऊर (ता. हवेली) येथील ऐश्वर्या राजेंद्र डोखळे – कुंजीर यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. (Aishwarya Dokhle of Theur – Kunjir selected as a Town Planning Officer)
राज्यात ओबीसी महिला प्रवर्गातून सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण..
त्या राज्यात ओबीसी महिला प्रवर्गातून सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. ऐश्वर्या राजेंद्र डोखळे – कुंजीर श्री क्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथे स्थायिक असून त्यांचे पती अजय कुंजीर सिव्हिल इंजिनिअर आहे. (Theur News) तर नाशिक जिल्ह्यातील कोठुरे (ता. निफाड) येथील राजेंद्र डोखळे यांच्या कन्या आहेत.
ऐश्वर्याचे पदव्युत्तर शिक्षण २०१९ मध्ये पूर्ण झाले. शासकीय सेवेत सेवा करण्याचे वडिल राजेंद्र डोखळे यांचे स्वप्न होते. (Theur News) पुढील पदव्युत्तर शिक्षण चालू असताना प्रशासकीय सेवेत नोकरीसाठी अभ्यास करण्यास सुरुवात केली.
ऐश्वर्याचे पदव्युत्तर शिक्षण सन २०१९ मध्ये पूर्ण झाले. यादरम्यान तिने पहिला प्रयत्न केला होता. त्यानंतर सन २०१९ मध्ये दुसर्यांदा प्रयत्न केला परंतु अपेक्षित यश मिळाले नाही. (Theur News) त्यानंतर कोरोना महामारीमुळे सर्व ठप्प झाले याच संधीचा फायदा घेऊन अभ्यासात सातत्य ठेवले आणि सन २०२१ मध्ये श्री क्षेत्र थेऊर येथील विठ्ठल हरिभाऊ कुंजीर यांचे चिरंजीव अजय कुंजीर यांच्याशी विवाह झाला.
दरम्यान, विवाहानंतर पती अजय यांनी देखील ऐश्वर्याच्या प्रशासकीय सेवेतील प्रयत्नांसाठी प्रोत्साहन देत होते. त्यानंतर २०२२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेतलेल्या सहाय्यक नगरविकास अधिकारी पदासाठीच्या परिक्षेत इतर मागासवर्गीय प्रवर्ग गटात राज्यात सहावा क्रमांक मिळविला. (Theur News) शेतकरी कुटुंबात आणि ग्रामीण भागात शिक्षण घेऊन,कौटुंबिक जबाबदारी पार पाडत ऐश्वर्याने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Theur Crime : थेऊर येथे ऊसाच्या पाचटाला लावली आग; दीड लाखांचे ठिबक जळाले…!