Pune News पुणे : रक्तपेढ्याांनी आता रक्तसाठ्याची दररोजची माहिती संकेतस्थळावर अपडेट करावी लागणार आहे. ज्या रक्तपेढ्या अशी माहिती संकेतस्थळावर देणार नाहीत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदे जाहीर केले आहे. तसे पत्र काही दिवसांपूर्वीच राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना पाठविले आहे. (…then the blood banks will have to pay the fine; State Blood Transfusion Council information; If information is not filled on the website, action will be taken)
माहिती देण्यात आली नाही तर प्रति दिवसासाठी एक हजार रुपये दंड
‘सर्वसामान्यांना रक्तसाठ्याची अद्ययावत माहिती सहज उपलब्ध व्हावी म्हणून रक्तसाठ्याची माहिती दररोज संकेतस्थळावर भरावी,’ अशा सूचना केंद्र सरकराने आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेने सर्व रक्तपेढ्यांना वारंवार केल्या आहेत. मात्र, सूचना करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. (Pune News) माहिती देण्यात आली नाही तर रक्तपेढीला प्रति दिवसासाठी एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
कोणत्या रक्तपेढीमध्ये किती रक्त उपलब्ध आहे, याची माहिती अनेकदा रुग्णांना नसते. परिणामी रुग्णांची गैरसोय होते. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या ई-रक्तकोष आणि राज्य संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर सर्व रक्तपेढ्यांनी रक्तसाठ्याची माहिती भरावी, अशा सूचना पूर्वीपासूनच दिल्या आहेत; तसेच वांरवार अशा प्रकारच्या सूचना करण्यात येत असतात.(Pune News) गेल्या वर्षीदेखील काही रक्तपेढ्यांनी अद्यावत माहिती न भरल्याचे दिसून आले होते.
याबाबत शहरातील खासगी आणि सरकारी रक्तपेढ्यांना विचारले असता सर्व रक्तपेढ्या दररोज दुपारी बाराच्या आत माहिती भरत असल्याचे सांगण्यात आले. (Pune News)
माहिती न भरणाऱ्या रक्तपेढीला दंड आकारल्यानंतर सात दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. दंडाची रक्कम जमा केल्याशिवाय परवान्याच्या नूतनीकरणासाठी लागणारे ना-हरकत प्रमाणपत्र मिळणार नसल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेने स्पष्ट केले आहे. ‘त्याचबरोबर इंटरनेट सुरू नव्हते, रक्तदान शिबीरासाठी कर्मचारी गेले होते, मनृष्यबळाची कमतरता आहे, रक्तपेढीला सुटी होती,’ या प्रकारची कारणे ग्राह्य धरण्यात येणार नाही. (Pune News) कोणत्याही रक्तपेढीला खुलासा द्यायचा असल्यास त्यांनी पुराव्यासह म्हणजे माहिती भरल्याचा ‘स्क्रिनशॉट’ सात दिवसांच्या आत राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या कार्यालयास सादर करावा, असेही आदेश म्हटले आहे.
रक्तसाठ्याची माहिती दररोज ई-रक्तकोष आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर भरली जाते. दररोज सकाळी अद्ययावत माहिती संकेतस्थळावर भरण्यात येते. त्याचबरोबर रक्तपेढीतदेखील माहिती देण्यात येत असते.
– डॉ. सोमनाथ खेडकर, प्रमुख, ससून रुग्णालय रक्तपेढी
जवळपास सर्व रक्तपेढ्या नियमीतपणे रक्तसाठ्याची माहिती ई-रक्तकोष आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर भरत असतात. मात्र, कोणत्या रक्तपेढीत रक्त उपलब्ध आहे, याची माहिती गरजू रुग्णांनादेखील सहजपणे मिळणे आवश्यक आहे. अनेकदा निगेटिव्ह आणि दुर्मीळ रक्तगट मिळण्यास अडचणी येतात. त्यामुळे अशा रक्तगटाची माहिती मिळणे आवश्यक आहे.
– राम बांगड, अध्यक्ष, रक्ताचे नाते ट्रस्ट
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यातील चांदणी चौक घेणार मोकळा श्वास ; उड्डाणपूल जुलैअखेर सुरू होणार
Pune News : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानास सुरुवात; ८ तालुक्यातील ११ कामांना सुरुवात
Pune Crime : पुणे स्टेशन परिसरात गांजा विकण्यासाठी आलेल्या दोन बिहाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या