राहुलकुमार अवचट
Pune Crime : यवत ( पुणे) : दौंड तालुक्यातील वरवंड येथे दि.२७ रोजी बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८ लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दौंड तालुक्यातील वरवंड येथे यात्रा काळात दि. २७ रोजी रात्री १० ते १२ च्या सुमारास वरवंड गावच्या हद्दीतील कडेठाण रस्त्यावरील बारकरवस्ती येथे बंद असलेल्या घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी घरात चोरी केली.
या चोरीत घरातील लोखंडी कपाटातील पर्स व किचनमधील डब्यातील मधील ०३.७ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी ०४.७ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ४५० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी १४.६६० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन १२.२६० ग्रॅम वजनाची सोन्याचे डोरले ६३.७५० ग्रॅम वजनाची सोन्याचे गंठण १३.१४० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ४१.०७० ग्रॅम वजनाची सोन्याची मोहन माळ ५.१७० ग्रॅम वजनाची सोन्याचे वेल , ५.०३० ग्रॅम वजनाची सोन्याची वेडणी आदि सोन्याच्या दागिन्यांसह ७२ हजार रुपये रोख, गाडीची चावी असा एकूण ०८ लाख ०६ हजार ५०१ रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
याबाबत महादेव ईश्वर जाधव यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी भेट दिली असून याबाबत पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे हे करीत आहेत