पिंपरी : पुण्यातील कल्याणीनगर भागातील पोर्शे अपघातानंतर सोशल मिडीयावर अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. सोसायटीतून कार बाहेर घेऊन जात असताना श्वानांना चिरडल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पोलिसांना मिळाल्यानंतर मारुंजीत एकावर गुन्हा दाखल करण्यात आहे. वन्यजीवप्रेमी नागरिकांमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार लाईफ रिपब्लिक, कोलते पाटील सोसायटीमध्ये १० जून रोजी घडला आहे..
या प्रकरणी राणाप्रताप रामदास भट्टाचार्य (वय-३४, रा. लाईफ रिपब्लिक, कोलते पाटील, मारुंजी) यांनी १३ जून रोजी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून शंतनु जयसिंग करांडे (वय-२७, रा. लाईफ रिपब्लिक, कोलते पाटील, मारुंजी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोसायटीतून कार बाहेर घेऊन जात असताना रस्त्यावर श्वानांचा एका घोळका बसला होता. यावेळी आरोपीने हयगयीने कार चालवत त्यांच्या अंगावर घातली. या अपघातात २ श्वान गंभिर जखमी. तर, एक श्वानाचा मृत्यू झाला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच सोसायटीतील नागरिक आणि काही प्राणी प्रेमी नागरिकांनी फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.