बारामती: बारामती तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वढाणे या गावामधून चोरीस गेलेल्या कांद्याच्या मालाचा शोध घेवुन हस्तगत करण्याबाबत तसेच शेतक-यांच्या कांद्याची चोरी करणा-या आरोपींचा शोध घेणे बाबतच्या सुचना अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागिय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी सुपा पोलिसांना दिलेल्या होत्या. या प्रकरणी दि.१९ फेब्रुवारी रोजी सुपा पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपींच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार अक्षय शांताराम गायकवाड (वय २९ वर्षे) आणि सतिश हिरामण शिंदे (वय २८ वर्षे), तसेच गोरख दगडु लकडे (वय २५ वर्षे) सर्व (रा. वढाणे ता.बारामती जि पुणे) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने सुपा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मनोजकुमार नवसरे, सहायक पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार किसन ताडगे व महादेव साळुंखे यांना चोरीच्या गुन्हाचा सखोल तपास करून आरोपीस तात्काळ अटक करून शेतक-यांचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या.
या गुन्हयाचा अधिक तपास करीत असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार किसन ताडगे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे तसेच सी.सी.टी.व्ही फुटेज, आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला. त्यानुसार पोलिसांनी, अक्षय शांताराम गायकवाड (वय २९ वर्षे) आणि सतिश हिरामण शिंदे (वय २८ वर्षे), तसेच गोरख दगडु लकडे (वय २५ वर्षे) सर्व रा. वढाणे ता.बारामती जि पुणे यांना दि.२१ फेब्रुवारी रोजी अटक करून त्यांना बारामती येथील न्यायालयात हजर केले.
या प्रकरणी आरोपीस न्यायालयाने दि.२३ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. पोलीसांनी आरोपींच्या कडुन शेतक-याचा
चोरीस गेलेला १३ पोती कांद्याचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकारणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विशाल गजरे करीत आहेत.
दरम्यान, सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांचें मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी, पोलिस हवालदार रुपेश साळुंके, राहुल भाग्यवंत, संदिप लोंढे, विशाल गजरे, पो.कॉ. सचिन दरेकर, सागर वाघमोडे, संतोष जावीर, तुषार जैनक, महादेव साळुंके, किसन ताडगे, यांनी केलेली आहे.