दीपक खिलारे
(Indapur News) इंदापूर : वकील संघटनेच्या वतीने पुणे जिल्हा बार असोसिएशनचे (association)अध्यक्ष ऍड.पांडुरंग थोरवे यांचे मोजणी आणि त्या संदर्भातील सर्व परिपत्रके याविषयावर एकदिवसीय मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ड्रोन व जीपीएस तंत्रज्ञान मार्फत होणाऱ्या मोजणीची दिली माहिती…
यावेळी एडवोकेट पांडुरंग थोरवे यांनी सम्राट अशोक यांच्या कालखंडापासून ते आजच्या आजच्या 2023 पर्यंतच्या तंत्रज्ञान युगातील मोजणीबाबत तसेच अलीकडच्या काळातील ड्रोन (drone)व जीपीएस तंत्रज्ञान मार्फत होणाऱ्या मोजणी, सॅटॅलाइट मोजणी त्या संदर्भातील नवीन नियम याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास इंदापूर न्यायालयाचे न्यायाधीश पी.एल. पाटील, न्यायाधीश के.सी. कलाल, न्यायाधीश एस.डी. वडगांवकर, एस.एस. साळुंखे, न्यायाधीश जे.बी. खटावकर यांसह सरकारी वकील गौरी कस्तुरे, वरिष्ठ महिला वकील खबाले, इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. मनोहर चौधरी, सचिव ऍड. आशुतोष भोसले इंदापूर बारचे वकील तसेच जिल्हा परिषद संघटनेचे वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
इंदापूर शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने इंदापूरमध्ये मोफत आभा कार्ड शिबीर