लोणी काळभोर दि.19: हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, उरुळी कांचन, कदमवाकवस्ती या मोठ्या ग्रामपंचायतींसह मार्च 2025 ते मार्च 2020 या कालावधीसाठी 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण ठरवण्यासाठी दि. 23 मार्च रोजी दुपारी 12 वाजता पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्र येथे सरपंच पदाची आरक्षण सोडत होणार आहे.
हवेली तालुक्यातील 71 पैकी 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत यावेळी काढण्यात येणार आहे. या 71 गावांची एकूण लोकसंख्या 262338 असून त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या 34752 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 5917 आहे. अनुसूचित जातीसाठी 10 सरपंच पदे राखीव रहाणार असून त्यातील 5 जागी पुरुष तर 5 जागी महिला सरपंच होणार आहेत. अनुसूचित जमातीसाठी 2 सरपंच पदे राखीव रहाणार असून त्यापैकी 1 जागी पुरुष तर एका जागी महिला सरपंच होणार आहे.
मागास प्रवर्गासाठी 19 सरपंच पदे राखीव रहाणार असून त्यापैकी 9 जागी पुरुष तर 10 जागी महिला सरपंच होणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 40 सरपंच पदे असून त्यापैकी 20 जागी पुरुष तर 20 जागी महिला सरपंच होणार आहेत.
पुढील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण ठरवण्या करता सोडत होणार आहे.
खानापूर, गोगलवाडी, अहिरे, खामगांव मावळ, मालखेड, गोऱ्हे बु., शिवापूर, मणेरवाडी, श्रीरामनगर, मांडवी बु., कुडजे, कोंढणपुर, खेडशिवापूर, गाउडदरा, आर्वी, आंबी, जांभळी, गोऱ्हे खुर्द, डोणजे, सोनापुर, मांजरी खुर्द, बहुली, मांडवी खुर्द, घेरासिंहगड, वरदाडे, सांगरुण, रहाटवडे, खडकवाडी, वडकी, उरुळी कांचन, कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर, थेऊर, लोणीकंद, सोरतापवाडी, कुंजीरवाडी, कोरेगाव मुळ, कोलवडी साष्टे, आव्हाळवाडी, केसनंद, वाडेबोल्हाई, हिंगणगाव, आळंदी-म्हातोबाची, अष्टापुर, वढु खुर्द, शिंदवणे, बकोरी, पेठ, डोंगरगाव, तुळापुर, भावडी, न्हावी सांडस, तरडे, बुर्केगाव, प्रयागधाम, वळती, शिरसवडी, बिवरी, सांगवी सांडस, भवरापुर, पिंपरी सांडस, शिंदेवाडी, खामगावटेक, टिळेकरवाडी, नायगाव व पेरणे या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत होणार आहे.
तर आगळंबे, निरगुडी, वडगाव शिंदे, फुलगाव व कल्याण या पाच ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत या दिवशी होणार नाही.