पुणे : पुण्यातील मावळ तालुक्यात तिहेरी हत्याकांडाची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने पुणे जिल्हा पुरता हादरून गेला आहे. एका महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे पुरावा नष्ट करण्यासाठी मृत महिलेचा मृतदेह नदीत टाकताना तिच्या दोन मुलांनी आरडाओरडा केली. यामुळे तिच्या दोन मुलांनाही आरोपींनी नदीत ढकलल्याची संतापजनक घटना घडली आहे.
ही घटना ६ ते ९ जुलै दरम्यान तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. बेपत्ता महिलेचा शोध घेताना ही संपूर्ण घटना समोर आली आहे.
याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करण्यात आली आहे. आरोपी प्रियकर गजेंद्र दगडखैर आणि त्याचा मित्र रविकांत गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
असा झाला उलघडा ?
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात विवाहित महिला बेपत्ता असल्याची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केला. या तपासात बेपत्ता महिलेच्या प्रियकराने तिचा गर्भपात करण्यासाठी तिला आपल्या मित्रासोबत ठाणे येथे पाठविले होते. ठाण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.
त्यानंतर प्रियकराच्या मित्राने मृत महिलेला आणि तिच्या दोन्ही मुलांना परत घेऊन येत असताना तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास प्रियकराने आणि त्याच्या मित्राने मदतीने महिलेचा मृतदेह नदीत फेकून दिला.
या प्रकारांमुळे दोन्ही मुलांनी टाहो फोडला. यावेळी आरोपींनी मुलं रडतात म्हणून त्यांनाही जिवंतपणे नदीत ढकलले. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास तळेगांव एमआयडीसी पोलीस करीत