Sharad Pawar News : पुणे: शिरुर लोकसभेतून विद्यमान खासदार डाॅ. अमोल कोल्हे हेच निवडणूक लढवतील,” असे खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, अशी चर्चा काही दिवसापासून सुरु होती. या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला. (The candidature of MP Dr Amol Kolhe from Shirur Lok Sabha is confirmed – NCP President Sharad Pawar himself announced this.
राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत केली घोषणा
पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक झाली. या बैठकीत आठ लोकसभा मतदार संघातील निवडणुकीबाबत चर्चा झाली. यावेळी वरील घोषणा शरद पवार यांनी जाहीर केली आहे. यावेळी डाॅअमोल कोल्हे , विलास लांडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
विद्यमान खासदार डाँ. अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, तर दुसरीकडे विलास लांडे यांनी शिरुर लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले. यामुळे शिरुर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती.
दरम्यान, “विद्यमान खासदार डाॅ. अमोल कोल्हे हेच शिरुरमधून लोकसभा लढवतील,” असे शरद पवार यांनी जाहीर केल्यानंतर विलास लांडे म्हणाले की. “निवडणूक लढविण्यासाठी मी फक्त इच्छा व्यक्त केली होती, पवार साहेबांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे,” असे लांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मानवतेसाठी धर्माधर्मांमध्ये संवाद वाढायला हवा : सबनीस
Pune News : पुण्यात तरुणाला नोकरीचे आमिष आणि टास्क पूर्ण करण्यास सांगून तब्बल १६ लाखांची फसवणूक