पुणे : पुण्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर रात्री एका आयसर टेम्पोला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत टेम्पो पूर्णपणे जळुन खाक झाला आहे. टेम्पोतील चालक आणि सहप्रवासी हे तात्काळ बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुबंई-पुणे एक्सप्रेसवेवरून आयसर टेम्पो मुंबईहून चेन्नईकडे जात होता. मुबंई-पुणे एक्सप्रेसवेवरील बोरघाटात आला असता अचानक त्याच्या केबिन मध्ये भीषणआग लागली. या आगीत टेम्पो पूर्णपणे जळुन खाक झाला आहे, तर टेम्पोतील चालक आणि सहप्रवासी हे तात्काळ बाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.
या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, देवदूत यंत्रणा आणि फायर ब्रिगेड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे शर्थीने प्रयत्न केले. काही वेळातच आगीवर नियंत्रण आणण्यात फायर ब्रिगेडला यश आलं.