पुणे : वर्गात दंगा करणाऱ्या एका विद्यार्थ्याला शिक्षेकेने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाण करतानाचा प्रकार विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये कैद केला. यानंतर संबंधित शिक्षिकेविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. ही घटना पुण्यातील एका शाळेत घडली असून याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. पूजा केदारी असं शिक्षिकेचे नाव आहे. त्यामुळे संस्थेने त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. यापूर्वी देखील या शिक्षिकेने बऱ्याच मुलांना बेदम मारहाण केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी घोळका करून बसले होते. तर काही मुले गोंगोट करीत होती. दंगा करत असल्याचे पाहून केदारी यांना हा गोंगोट सहन न झाल्याने मारहाण केली. हा व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाहिल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिसात शिक्षकेविरुद्ध तक्रार दाखल केली.
दरम्यान, यापूर्वी देखील या शिक्षिकेने बऱ्याच मुलांना बेदम मारहाण केली असल्याची माहिती पालकांनी पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पालकांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये शिक्षकेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तसेच या शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी शाळा प्रशासन आणि पोलिसांकडे केली आहे. घडलेल्या प्रकारामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम झाला तर जबाबदार कोण, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.