Talegaon Dhamdhere : तळेगाव ढमढेरे : भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक देवस्थान असून, या ठिकाणी श्रावण महिन्यात नागरिकांची मोठी गर्दी असते. या ठिकाणी सर्वसामान्य महिलांना दर्शन घेता यावे म्हणून भाजप युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नवनाथ भुजबळ यांनी तब्बल सव्वाशे महिलांना भीमाशंकर दर्शन घडवले आहे.
कासारी (ता.शिरुर) येथील शेतकरी महिला शेतीच्या कामात नेहमीच व्यस्त असतात. तसेच महिलांच्या परिस्थितीचा विचार करत महिलांना श्रावण महिन्यात भीमाशंकर दर्शन घडावे या हेतूने नवनाथ भुजबळ यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील व उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी मोफत भीमाशंकर दर्शनचे आयोजन केले होते.(Talegaon Dhamdhere) यावेळी भारतीय जनता पक्ष उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे, कासारीचे माजी उपसरपंच गोपाळ भुजबळ, भाऊसाहेब सूर्यवंशी, बापू नरके यांसह आदींच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले.
भाजपच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबविणार
दरम्यान, तब्बल 120 महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवत भीमाशंकरचे दर्शन घेतले. महिलांसाठी नाश्ता व जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली होती. (Talegaon Dhamdhere) तर पुढील काळात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबवण्यात येणार असल्याचे संजय पाचंगे व नवनाथ भुजबळ यांनी सांगितले.
यावेळी शरद बुट्टे पाटील यांनी महिलांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. तर महिलांनी देखील समाधान व्यक्त करत आयोजकांचे विशेष आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : वानवडीत तरुणाचा दगडाने ठेचून खून; पाच अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात