लोणी काळभोर, (पुणे) : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील स्वप्नील वंसतराव कुंजीर यांची शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) धाराशिव लोकसभा निवडणूक समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यानुसार, पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी नवख्या चेहऱ्यांना ठाकरे गटाकडून संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, कुंजीर हे बावीस वर्ष शिवसेनेशी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रामाणिक आहेत. पक्षाशी एकनिष्ठ आणि विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. शिवसेनेत विद्यार्थी सेनेपासून त्यांनी कामाची सुरुवात केली होती. महाराष्ट्रातून निवडलेल्या अठरा लोकांमध्ये कुंजीर यांचा समावेश असल्याने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी चोख पार पाडणार
या निवडीनंतर स्वप्नील कुंजीर म्हणाले, “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेली जबाबदारी चोख पार पाडणार असून, धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत संपूर्ण जिल्हा भगवेमय करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांचे हात आणखी बळकट करण्यासाठी व पक्षप्रमुखांनी दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी संपूर्ण ताकदीने काम करणार आहे”.