उरुळी कांचन, (पुणे) : येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी पुणे द्वारातालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी विवेकानंद विद्यामंदिरातील विध्यार्थ्यानी विविध क्रीडा प्रकारांमध्ये यश संपादन केले असल्याची माहिती मुख्याध्यापिका ज्योती भोसले यांनी दिली.
14 वर्षाखालील गोळाफेक गटात तनिष आनंदा बोडके याने प्रथम क्रमांक, कुस्तीत भूमिका रोहिदास म्हेत्रे हिने प्रथम क्रमांक, तसेच 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत आर्या नितीन गुकुंजकर प्रथम क्रमांक, तर 16 वर्षीय थाळीफेक व भालाफेक स्पर्धेत गिरीजा संजय टेमगिरे हिने द्वित्तीय क्रमांक पटकाविला. या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
लांब उडीत स्वराली विनायक गायकवाड हिने तृतीय क्रमांक पटकाविला. सिया शामराव मोरे हिने 200 मीटर धावण्यात तृतीय क्रमांक, सृष्टी रोहिदास मते कुस्तीत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. स्वराज सागर म्हस्के व निखिल संतोष देवडे यांनीही कुस्तीत द्वितीय क्रमांक मिळविला.
दरम्यान, बॅडमिंटन स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या संघाचा दुसरा क्रमांक आला तर 17 वर्षाखालील मुलींच्या संघाचा तिसरा क्रमांक आला. रिले स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुलांच्या संघाचा तिसरा क्रमांक आला आहे. वरील सर्व विजेत्या खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व विश्वस्त, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवृंद यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.