-राहुलकुमार अवचट
यवत : पक्ष विरोधात भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दौंड तालुकाध्यक्ष उत्तम आटोळे यांचे निलंबन करण्यात आले आहे.
दौंड विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असताना अजित पवार यांनी दौंड मध्ये महायुतीचा धर्म पाळण्यासाठी राहुल कुल यांच्या पाठीशी भक्कमपणे राहण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दौंड तालुका अध्यक्ष उत्तम आटोळे यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांचे निलंबन करण्यात आल्याचे पत्र जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी उत्तम आटोळे यांना दिले असल्याचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उत्तम आटोळे यांची पक्षातून हकालपट्टी करून अजित पवार गट महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल कुल यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याचे स्पष्ट संकेत अजित पवार गटाने दिले आहेत. याबाबत अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही