उरुळी कांचन, (पुणे) : सोरातपवाडी (ता. हवेली) येथील शेतकरी सुरेश दत्तात्रय जाधव (वय- ६२) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (ता. ०३ )निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे. प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे सदस्य व दैनिक पुढारीचे वार्ताहर जयदीप जाधव यांचे ते वडील होत.
दरम्यान, त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सोरतापवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.