Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार? सुप्रिया सुळेंचा अनुभव ठरू शकतो प्रभावी तर सुनेत्रा पवार…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 18 February 2024, 20:50

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्रे आल्यानंतर अजित पवार विरूद्ध शरद पवार एकप्रकारे राजकीय लढा सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातही खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद-भावजयचा सामना पाहायला मिळणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवार घराण्याचा पारंपारिक मतदारसंघ समजला जातो. त्यामुळे ही जागा जिंकण्यासाठी दोन्ही गटांकडून प्रयत्न केले जाणार आहे. त्या दृष्टीने पावलेही उचलण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खासदार सुळे यांनी मतदारसंघात लक्ष केंद्रित करत भेटीगाठी सुरू केल्या. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा देखील प्रचार केला जात आहे. या मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार यांनी केलेल्या विकासकामांची माहिती देणारा चित्ररथ फिरत आहे. असे जरी असले तरी सुप्रिया सुळे यांचा आतापर्यंतचा अनुभव आणि त्यांनी केलेली कामे बघता सामना एकतर्फी होण्याची चर्चा मतदारांमध्ये आहे.

जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट वरिष्ठांना बारामती लोकसभा मतदारसंघाचा अहवाल दिला. त्यात बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार असतील तरच खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव अटळ असल्याचे म्हटले होते. त्यामुळे भाजपकडून अजित पवारांवर दबावतंत्र वापरण्यात येत होते. अखेर गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांनी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली. तसे बॅनरही काही ठिकाणी झळकले आहेत.

 

सुनेत्रा पवार थेट निवडणुकीच्या रिंगणात; तयारीही सुरु

राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप कोणालाही उमेदवारी जाहीर केली नाही. असे असले तरी सुनेत्रा पवार थेट रिंगणात उतरल्या आहेत. त्यांनीही हळदी-कुंकूसारखे कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी केलेल्या कामांची माहिती पोहोचवण्यासाठी संपूर्ण मतदारसंघात चित्ररथ फिरवले जात आहेत. तसेच त्यांनी दौंडमध्ये जाऊन आमदार राहुल कुल कुटुंबीयांची देखील त्यांनी भेट घेतली आहे.

लोकशाहीत कुणीही विरोधात उभे राहू शकतं

बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोणीही उभे राहू शकते. लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभे राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तो अधिकार कोणी गाजवत असेल तर त्यासंबंधी तक्रार करण्याचे काहीच कारण नाही, असे शरद पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत अजित पवारांनी केलेल्या आरोपांचे चोख प्रत्युत्तर दिले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

इन्स्टाग्राम भारतात बंद होणार? व्हायरल मेसेजवर केंद्र सरकारने केला खुलासा; जाणून घ्या सत्य

Tuesday, 28 July 2026, 11:30

पाण्याच्या मोटरीवरून वाद, अन् शेतकऱ्यावर केला कुऱ्हाडीने हल्ला; शिरूरमधील धक्कादायक घटना

Tuesday, 28 July 2026, 11:14

थेऊरमध्ये केळीच्या बागेत रंगला तीन पत्त्यांचा डाव; लोणी काळभोर पोलिसांच्या धाडीत 9 जणांना पकडले रंगेहाथ

Tuesday, 28 July 2026, 11:05

सोलापूर जनता सहकारी बँकेचे 4 कोटींचे कर्जप्रकरण! न्यायालयाने सील केलेल्या मालमत्तेचे कुलूप तोडून बळजबरीने ताबा; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 10:45

राष्ट्रवादी एकत्र येणार? दिल्लीतल्या भेटीगाठींनी महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

Tuesday, 28 July 2026, 10:39

कोणाचा पत्ता कट होणार?मंत्रिमंडळ फेरबदलापूर्वी उपमुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, मंत्र्याच टेन्शन वाढलं!

Tuesday, 28 July 2026, 10:27
Next Post

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवनेरी किल्ल्याजवळ पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; 70 जण जखमी, चौघांची प्रकृती गंभीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.