उरुळी कांचन : सोरतापवाडी (ता. हवेली) गावाच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सुनिल सुखराज चौधरी यांची तर उपाध्यक्षपदी सुनिल सुदाम ढगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मावळते अध्यक्ष अशोकराज चौधरी आणि उपाध्यक्ष प्रवीण चोरघे यांनी राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते. हि निवडणूक प्रक्रिया सोरतापवाडीच्या सरपंच संध्या चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. २६) पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी सुनिल चौधरी यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी सुनिल ढगे यांचा एकमेव अर्ज आल्याने, निवडणूक निर्णय अधिकारी संध्या चौधरी यांनी सुनिल चौधरी यांची अध्यक्षपदी तर सुनिल ढगे यांची उपाध्यक्षपदी सुनिल ढगे बिनविरोध झाल्याची घोषणा ग्रामसभेत केली.
दरम्यान, सोरतापवाडी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सुनिल चौधरी व उपाध्यक्षपदी सुनिल ढगे यांची बिनविरोध होताच, ग्रामपंचायतीच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी जेष्ठ नागरिक संघाचे राज्यप्रमुख सोनबा चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास चौधरी, हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तानाजी चौधरी, उपसरपंच शंकर कड, माजी उपसरपंच निलेश खटाटे, अमित चौधरी, ग्रामपंचायत सदस्य सनी चौधरी, अजिंक्य चौधरी, राजू चौधरी, नामदेव चौधरी, नवनाथ चौधरी, सोमनाथ चौधरी, माधुरी चौधरी, शीतल चौधरी, रेखा चौधरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पदाच्या माध्यमातून गावातील तंटे, राजकीय वादविवाद सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष सुनिल चौधरी यांनी ”पुणे प्राईम न्यूज”शी बोलताना सांगितले आहे.