Summer | पुणे : पुणे शहरसह परिसरातील तापमानाचा पारा चाळीशीच्या पार गेल्याने पुणेकर हैराण झाले आहेत. संपूर्ण पुण्यातील सरासरी तापमान ४१ अंश सेल्सिअसवर गेले आहे. तर सर्वाधिक तापमानाची नोंद कोरेगाव पार्क येथे ४२. ८ नोंदली गेली आहे. त्यामुळे दोन-तीन दिवस पुणेकर उष्णतेमुळे घामेघूम होणार आहेत. हवामान कोरडे राहणार असल्याने उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
दरवर्षी पुण्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी शहराचे तापमान ४० अंशांच्या आतच नोंदविले जात होते. पुणे हे खऱ्या अर्थाने हिल स्टेशन समजले जात होते. पण आता हा शिक्का कधीच पुसला गेला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये पुणे थंड राहिले नसून, ते चांगलेच तापू लागले आहे. यंदा तर हवामानात प्रचंड चढ-उतार पहायला मिळत असून, उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव पुणेकरांना येत आहे. सध्या दोन दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून, किमान तापमानही वाढले आहे.
दम्यान, कमाल तापमानाचा पारा ४०-४२ अंश सेल्सिअसवर गेला आहे. तर किमान तापमान सर्वाधिक २७ नोंदले गेले. त्यामुळे रात्री देखील गरमीने पुणेकर हैराण झाले आहेत.
पुण्याचे किमान व कमाल तापमान…
वडगावशेरी २७.७ ४२.२
कोरेगाव पार्क २६.३ ४२.८
हडपसर २४.८ ४१.८
शिवाजीनगर २२.७ ४०.१
एनडीए २२.१ ३९.४
पाषाण २०.९ ४०.१
हवेली २०.६ ३८.३
सध्या तापमानाचा पारा वाढलेला असून, येत्या ७२ तासांमध्ये कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. कदाचित वर्षभरातील हे तापमान सर्वाधिक नोंदले जाण्याची शक्यता आहे. – अनुपम कश्यपी, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Summer Tips | उन्हाळ्यात घामोळ्यांनी त्रस्त आहात?, मग हे घरगुती उपाय करून पहा
Summer Camp | लोणी काळभोर येथील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उन्हाळी शिबीराचा लुटला आनंद