देऊळगाव राजे : प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव राजे येथे कुटुंब कल्याण योजनेचे एकूण छत्तीस शस्त्रक्रिया यशस्वीरित्या झाल्या आहेत. या साठी फलटण येथील सर्जन डॉ.अनिल कदम यांना बोलावण्यात आले होते.
यावेळी सोबत प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय आधिकरी डॉ.अविनाश आल्लमवार व डॉ.स्नेहा शिंदगणे. डॉ. कोमल गावडे, डॉ अजयकुमार पोतन, मयूर वाहुळे, तनुजा कुऱ्हाडे, सुप्रिया तलवारे, आरोग्य सहायिका निर्मला म्हांकाळे, संगीता नगरे, निशा राउत, निशा ताटे, माया काळे, संदेशा परदेशी, मेघा रणधीर, आरोग्य सहायक्क सीताराम कोकडे, गोपाळ ताटे, शरद दिवेकर, अक्षय इधाते, संदीप कोल्हे, पद्माकर नकुले, सुनील ससाणे, औषध अधिकारी रुक्साना तडवी गट प्रवर्तक अनिता आवचर, लॅब सहायक दीप्ती पलांगे, अमोल वाघमारे, रुग्णवाहिका चालक गणेश कोल्हे व सर्व आशा टीम हे ऑपरेशन थिएटर मध्ये सकाळी पाच वाजल्या पासून सर्व्ह स्टाफ हजर होते. अवकाळी वादळी वारा व पावसामुळे रात्रभर विजेचा लपंडाव सुरु होता, स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ऑपरेशन कॅम्प निर्विघ्न पार पडला.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या योग्य नियोजन व इमारतींच्या स्वच्छ्ता व इतर सोयीसुविधांचा विचार करता ऑपरेशन साठी इच्छुक महिला लाभार्थी संख्या शेकड्याच्या घरात आहे. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्राची बेड क्षमता लक्षात घेता ठराविक आकडा या कॅम्प मध्ये घेण्यात आला व पुढील महिन्यात उरलेल्या रुग्ण लाभार्थ्यांना सेवा देण्यात येईल. असे डॉ. अविनाश आल्लमवार यांनी सांगितले.