उरुळी कांचन : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी पुणे, यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुका स्तरीय शालेय मैदानी क्रीडा बालेवाडी येथे संपन्न झाल्या. या मैदानी क्रीडा स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवल्याची माहिती प्राचार्य भारत भोसले यांनी दिली.
17 वर्षे वयोगटात सुजल वामन जाधव याने थाळीफेक, गोळा फेक व भाला फेक या तिन्ही क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. अभय अंकुश लोंढे याने भाला फेक मध्ये द्वितीय क्रमांक, समर्थ भोलेनाथ कांचन याने लांब उडीत द्वितीय क्रमांक, तर संजय दत्ता राखपसरे याने गोळा फेक मध्ये तृतीय क्रमांक पटकाविला.
जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धा हुतात्मा शिवराम हरी राजगुरू तालुका क्रीडा संकुल खेड (तिन्हेवडी) येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत 14 वर्ष वयोगटात मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक व 17 वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवून विजेत्या संघाची विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे. 17 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला तर 19 वर्षे वयोगटातील मुला मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला.
दरम्यान, सर्व विजेत्या खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षक सर्व क्रीडा शिक्षकांचे संस्थेचे सर्व पदाधिकारी विश्वस्त, विद्यालयाचे प्राचार्य, उपप्रमुख, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.