योगेश शेंडगे
शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातकरवाडीने सन २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या मंथन परीक्षेमध्ये घवघवीत संपादन केले आहे. या प्राथमिक शाळेत पहिली ते चौथी एकूण २१ विद्यार्थी शिकत आहेत. त्यामधील १५ विद्यार्थी मंथन परीक्षेस बसले होते व सर्व विद्यार्थी पात्र झाले आहेत. त्यापैकी पूर्वा शरद जाधव व शौर्य अनिल सातकर (इ .१ ली) यांनी 130 गुण मिळवून निमगाव केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच सर्वेश लक्ष्मण जाधव (इ.१ ली) 120 गुण निमगाव केंद्रात पाचवा, अर्पित दिलीप पवार (इ.३ री) 244 गुण केंद्रात तिसरा, दिगीजा पोपट रासकरने (इ.४थी ) 236 गुण प्राप्त करत केंद्रात दुसरा क्रमांक मिळवला.
मंथनची ही परीक्षा पीएमश्री नवोदय व पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण मानली जाते. परिसरातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणून सातकरवाडी शाळेचा नवलौकिक आहे. या विद्यार्थ्यांना रासकर व जाधव या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. शाळा व्यवस्थापन समिती सातकरवाडी यांनी यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.