लोणी धामणी / राजु देवडे : पारगाव (कारखाना) ता.आंबेगाव येथे आंबेगाव तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने रविवारी (दि.३) अष्टविनायक महामार्गावर रास्ता रोको करणार असल्याची माहिती सकल धनगर समाज आंबेगाव यांनी निवेदनाद्वारे देण्यात आली.
महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाचा अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन, रास्ता रोको करण्यात येत असून, आंबेगाव तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व धनगर आरक्षणाची अंमलबजावणीच्या आंदोलनासाठी रविवारी (दि.३) ११ वाजता पारगाव (कारखाना) या ठिकाणी आंबेगाव तालुका सकल धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.