उरुळी कांचन (पुणे) : येथील सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वाकडा पुलावरील कठडा बसविण्यास अखेर सुरुवात करण्यात आली. ‘पुणे प्राईम न्यूज’मध्ये ‘सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील वाकडा पूल वाहनांसाठी बनतोय मृत्यूचा सापळा, दुरुस्तीकडे प्रशासनाची डोळेझाक’ या मथळ्याखाली गुरुवारी (ता.४) रोजी बातमी प्रसिद्ध झाली होती. या वृत्ताची दखल घेत संबंधित विभागातर्फे वाकडा पूल येथे संरक्षक कठडे बसवण्याचे काम सुरू झाले आहे.
सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील वाकडा पुलावर कामगार काम करताना दिसून येत आहेत. तसेच पुलाच्या इतर संरक्षित कठड्यांवर वाहनांना अंदाज येण्यासाठी रंगरंगोटीही करण्यात आली आहे. संरक्षक कठडा बांधण्याचे काम सुरू झाल्याने साहजिकच त्या मार्गावरुन जाणारे वाहनचालक समाधान व्यक्त करत आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावरून दररोज याच ठिकाणावरून हजारो वाहने या महामार्गावरून वाहतात. हजारोंच्या संख्येने रोज वाहने प्रवास करतात. पुणे, हडपसर, लोणी काळभोरसह परिसरात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. छोट्या व मोठी अवजड वाहने, स्कूल बस, नोकरदार, कामगार हे सर्व याच रस्त्यावरून प्रवास करतात. दरम्यान, या वृत्ताची दखल घेत सदर पुलाच्या कठड्याचे काम संबंधित विभागाने सुरु झाले आहे.
‘पुणे प्राईम न्यूज’कडून वेळोवेळी पाठपुरावा
दरम्यान, नागरिकांच्या हक्काचं असं दैनिक असलेल्या ‘पुणे प्राईम न्यूज’कडून नागरिकांच्या प्रश्नांचं वेळोवेळी वार्तांकन केलं जात आहे. इतकेच नाहीतर प्रशासनाला जाब देखील विचारण्यात येत आहे. त्यातूनच प्रशासनाकडून गंभीर दखल घेऊन कामे होत असल्याचे यावरून दिसत आहे.