Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भारताच्या विकास प्रक्रियेत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अत्यंत महत्वाची ठरेल : केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Saturday, 16 December 2023, 20:06

रांजणगाव गणपती (पुणे) : पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ भारताच्या विकास प्रक्रियेत सर्वसामान्य लोकांना सहभागी करून घेण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरेल, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील विकसित भारत यात्रेला दूरदृष्यप्रणालीद्वारे संबोधित करून अनेक लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी असताना चौधरी बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे, शिरूरचे गट विकास अधिकारी महेश डोके, अल्केश उत्तम आदी उपस्थित होते.

 

चौधरी म्हणाले, देशातील सर्वसामान्य जनतेचा विकास झाला तरच भारत जगात विकसित राष्ट्र म्हणून उदयाला येईल. २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान मोदी यांचे उद्दिष्ट असून जोपर्यंत देशातील प्रत्येक व्यक्ती सुविधा संपन्न होणार नाही तोपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. हा उद्देश साध्य करण्यासाठी विकसित भारत यात्रेच्या माध्यमातून केंद्राच्या विविध योजना स्थानिक आणि गाव पातळीपर्यंत पोहचविण्यात येत आहेत.

जे नागरिक योजनांपासून वंचित आहेत, ज्यांना आतापर्यंत योजनांचा लाभ मिळाला नाही अशा गरजू नागरिकांना यात्रेच्या माध्यमातून जागेवरच योजनांचा थेट लाभ दिला जात आहे. गेल्या ९ वर्षात देशभरातील गरिबांच्या खात्यात विविध योजनांच्या माध्यमातून किमान ३३ लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे, असे सांगून महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी होऊन केंद्राच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

चव्हाण म्हणाले, केंद्र शासन पुरस्कृत योजना तळागळातील नागरिकांना पोहचविण्याच्या दृष्टीने सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला पुणे जिल्ह्यात चांगला प्रतिसाद आणि नागरिकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. यात्रेच्या माध्यमातून वंचित घटकातील नागरिकांना योजनांची माहिती देण्यात येत असून, त्यांना थेट लाभ दिला जात आहे. ही यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू राहणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमात मंत्री चौधरी यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, आयुष्मान भारत कार्ड, बचत गटांना खेळते भांडवलसाठी आर्थिक मदतीचे धनादेश, जल जीवन मिशनचे कार्यारंभ आदेश इत्यादी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44
Next Post
Sarpanch post election of koregaon mul grampanchyat very soon haveli pune

हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ सरपंच पदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा, खुर्चीच्या खेळाची नऊ महिन्यानंतर अखेर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.