Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 5 July 2026, 15:24

पुणे: पुणे शहर, जिल्हा आणि घाटमाथ्यावर शनिवारी दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासूनच आकाश ढगांनी भरून गेले होते. त्यामुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. अधूनमधून मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. शहरातील अनेक भागांत वाहतूक संथ झाली, तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटनाही घडल्या.

शुक्रवारी मध्यरात्री सुरू झालेला पाऊस शनिवारीही कायम होता. सकाळी आणि दुपारच्या सुमारास काही भागांत जोरदार सरी कोसळल्या. शहरात सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत १४.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सलग चार दिवस पाऊस होत असल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठीही ही परिस्थिती दिलासादायक मानली जात आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरणी आणि इतर शेतीच्या कामांना वेग मिळाला असून, ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून पुण्यासह राज्यातील अनेक भागांत चांगला पाऊस होत आहे. हवामान विभागाने ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

 

रविवारी पुणे शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर पुणे-सातारा घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वर्षासहलीसाठी जाणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक आणि विदर्भातील अनेक भागांतही शनिवारी मुसळधार पाऊस झाला. राज्यातील काही भागांमध्ये जनजीवनावर त्याचा परिणाम झाला असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नवरात्र बंदोबस्तात रक्तरंजित थरार! भरधाव कारने पोलिसांना चिरडलं; उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू, 11पोलीस गंभीर…

Sunday, 18 October 2026, 10:43

दुष्काळाच्या संकटात फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! सर्व विभागांना अनावश्यक खर्चावर लगाम घालण्याचे निर्देश; नेमकं काय ठरलं?

Sunday, 18 October 2026, 9:54

दांडियाच्या जल्लोषात काळाचा घाला! कॉलेजमध्ये लोखंडी सांगाडा कोसळला; तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी!

Sunday, 18 October 2026, 9:10

मृत्यूचा हाहाकार!भाविकांच्या गर्दीत घुसला भरधाव ट्रक; सर्वत्र रक्ताचाच सडा, 12 जणांचा मृत्यू अन् 39जखमी.

Sunday, 18 October 2026, 8:26

सासूची हत्या, नवी ओळख अन् 26 वर्षांचा पोलिसांना गुंगारा! पुण्यातच लपून बसलेल्या आरोपीचं अखेर बिंग फुटलं कसं?

Sunday, 18 October 2026, 8:10

पुण्यात रॅपिडोला मोठा दणका! विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Sunday, 18 October 2026, 7:53
Next Post

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp