Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 5 July 2026, 15:38

मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे कुर्ला परिसरात झाड कोसळून एका ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. युनुस कुंदावाला (वय 63) असे मृताचे नाव असून, या घटनेमुळे मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर आणि मान्सूनपूर्व कामांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

कुर्ला (पश्चिम) येथील कमानी परिसरातील ‘गोम्स गाऊन बिल्डिंग’जवळ रविवारी दुपारी अचानक सोसाट्याचा वारा सुटला. यावेळी तेथील एक मोठे झाड शेजारील दुकानावर उन्मळून पडले. दुर्दैवाने, त्याच दुकानात हजर असलेले युनुस कुंदावाला झाडाच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले. स्थानिक रहिवाशांनी त्यांना तातडीने बाहेर काढून जवळच्या ‘फौझिया हॉस्पिटल’मध्ये नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

या दुर्घटनेनंतर मुंबई अग्निशामक दल, पोलीस, बेस्टचे कर्मचारी आणि पालिकेच्या वॉर्ड ऑफिसचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वीजवाहिन्या तुटल्यामुळे परिसरातील वीज खंडित झाली होती, जी पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.

काही दिवसांपूर्वीच चेंबूर येथे स्कूलबसवर झाड पडून एका विद्यार्थ्याचा जीव गेल्याची घटना ताजी असतानाच, कुर्ल्यामध्ये ही दुसरी मोठी दुर्घटना घडली आहे. झाड छाटणीच्या पालिकेच्या दाव्यांची पोलखोल या घटनेमुळे झाली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, एवढी भीषण दुर्घटना होऊन 4 ते 5 तास उलटले, तरी महापालिकेचा एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही.

 

महापालिकेच्या या उदासीन भूमिकेमुळे स्थानिक नागरिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले. पालिकेच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप मुंबईकरांना जीव गमवावा लागत असल्याचा आरोप करत मनसैनिकांनी प्रशासनाचा तीव्र निषेध केला आहे .

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp