Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ सरपंच पदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा, खुर्चीच्या खेळाची नऊ महिन्यानंतर अखेर

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 16 December 2023, 20:19
Sarpanch post election of koregaon mul grampanchyat very soon haveli pune

उरुळी कांचन : कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे सरपंच विठ्ठल राजाराम शितोळे यांच्या विरोधात 10 विरुद्ध 3 मतांनी मंजूर झालेला अविश्वास ठराव सर्वोच्च न्यायालयाने देखील वैध ठरविला आहे. सरपंचपदाची खुर्ची टिकविण्यासाठी व मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत रंगलेला हा संघर्ष आता संपुष्टात आला आहे.

कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीचे सरपंच शितोळे यांच्या विरोधात 21 फेब्रुवारी 2023 रोजी ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला ठराव 10 विरुद्ध 3 मतांनी मंजूर झाला होता. या ठरावाविरुध्द सरपंच शितोळे यांनी तीन ग्रामपंचायत सदस्यांनी मुदतीत जातपडताळणी दाखल केली नाही म्हणून त्यांचे सदस्यत्व रद्द करुन झालेला ठराव हा अवैध असल्याच्या मुद्दावर पुण्याचे जिल्हाधिकारी आणि मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा प्रयत्न केला होता.

1 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होत उच्च न्यायालयाने विठ्ठल शितोळे यांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर शितोळे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत शेवटचा पर्यायही अवलंबून पाहिला. यावर सर्वोच्च न्यायालयाने १२ डिसेंबरला सुनावणी घेऊन हे प्रकरण तात्काळ निकाली काढत मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. त्यामुळे आता कोरेगाव मूळ ग्रामपंचायत सरपंचपदाच्या ‘संगीत’ खुर्चीचा अखेर निकाल लागला आहे.

 

दहा सदस्यांकडून अविश्वास ठराव दाखल

कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीच्या १३ पैकी १० सदस्यांनी सरपंच शितोळे यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्यामध्ये बहुमताने घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणे, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीचे कामकाज करणे, सदस्यांना अपमानास्पद वागणूक देणे, मनमानी पद्धतीने कामकाज करणे, अशा तक्रारी या दहा सदस्यांनी नमूद केल्या होत्या.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
MNS pimpri chinchwad protest statement of smriti irani pune menstrual cycle

केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्या 'त्या' विधानावरून मनसे पिंपरी चिंचवड महिला संघटना आक्रमक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.