Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवत येथील श्री काळभैरवनाथ व श्री महालक्ष्मी माता यात्रेची कुस्तीच्या आखाड्याने सांगता; यवतकरांनी अनुभवला ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Sunday, 25 February 2024, 21:38

यवत : यवत येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व श्री महालक्ष्मी माता यात्रेची नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घेत कुस्तीचा आखाडा पार पडला. यावेळी बहुतांश कुस्त्या चितपट झाल्या असल्या तरी यावर्षीचे महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व उपमहाराष्ट्र केसरी सागर बिराजदार यांच्या कुस्तीने यवतकरांनी ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार अनुभवला.

माघ पौर्णिमेनिमित्त श्री काळभैरवनाथ व श्री महालक्ष्मी माता यात्रेनिमित्त यवत येथे दरवर्षी जंगी आखाडा भरतो. पुणे, कोल्हापूर येथे तालीम करणाऱ्या स्थानिक मल्लांसोबतच पंजाब, हरीयाणा यासारख्या परप्रांतासह राज्याच्या विविध जिल्ह्यातून अनेक मल्लांनी यावेळी कुस्ती आखाड्यामध्ये सहभाग घेतला. स्थानिक मल्ल राष्ट्रीय खेळाडू मंगेश दोरगे व यांच्यात झालेल्या चितपट कुस्त्यांनी यवतच्या आखाड्याला मोठी रंगत आली.

यवत येथे समाधानकारक इनाम मिळत असल्याने येथे मल्लांची मोठी गर्दी झाली होती. शेवटच्या कुस्तीचे इनाम हे या आखाड्याचे एक वैशिष्ट आहे. दरवर्षी वाढणारा हा आकडा यावर्षी १ लाख ५१ हजार रूपयांवर गेला होता. सायंकाळी ५ वाजता सुरू झालेला आखाड्याची सांगता रात्री ८ वाजता झाली.

सुरुवातीला परिसरातील लहान मल्लांपासून प्रारंभ झालेली यात्रा अखेर महाराष्ट्र केसरीपर्यंत यवतकरांनी अनुभवली अखेरच्या मानाच्या ८ कुस्त्यांमध्ये शेवटच्या ८ कुस्त्यांमध्ये ८ वी कुस्ती सोमनाथ डोंबाळे विरूद्ध दादा गजगुडे यांच्यात चितपट झाली. तर ७ वी कुस्ती महादेव बागडे विरुध्द विराज सावंत यांच्यात होती. परंतु ऐनवेळी मल्ल बदली झाल्याने कुस्ती झाली नाही. यानंतर अनुक्रमे कुमार माने – युवराज कदम ,अक्षय कामठे – यश इनामके, रोहित जवळकर – राहुल दिवेकर, उपहिंद केसरी तुषार डुबे – अक्षय गरुड यांच्या कुस्त्या बरोबरीत पार पडल्या. गेल्या वर्षी प्रमाणेच याही वर्षी झालेल्या मंगेश दोरगे – संतोष नरुटे (५२ हजार ) यांची चितपट कुस्तीत मंगेश दोरगे याने बाजी मारली.

 

यावेळी आंतरराष्ट्रीय मनीषा दिवेकर व हर्षदा वरुडकर यांचा सन्मान करण्यात आला. तर २०१८ चा महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख – उपमहाराष्ट्र केसरी सागर बिराजदार यांच्यात १ लाख २५ हजार रुपये रुपयांसाठी अंतिम लढत झाली. गेल्या वर्षी १ लाख ५१ हजार रुपयांसाठी झालेली कुस्ती यावर्षी २६ हजारांनी कमी झाली.

डाव प्रतिडावाने फेडले डोळ्याचे पारणे

मानाच्या कुस्तीगटातील काही कुस्ती बरोबरीत सुटली असल्या तरी आखाड्यात गाळलेला घाम आणि त्यांनी केलेल्या डाव प्रतिडावाने लोकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. कुस्ती समालोचक किसन काळे यांच्या समालोचनामुळे परिसरातील वातावरण कुस्तीमय झाल्याने नागरिकांनी कुस्तीचा खरा आनंद अनुभवला.

कुस्ती आखाड्यासाठी पंच म्हणून यात्रा कमिटीचे अध्यक्ष सदानंद दोरगे, सतीश दोरगे, शंकर दोरगे, संजय दोरगे, दिलीप दोरगे यांनी काम पाहिले. यवत येथे होणाऱ्या शेवटच्या कुस्त्या या मानाच्या कुस्त्या म्हणून संबोधले जाते. यातील बहुतांश कुस्त्या याबरोबरच सोडवल्या जातात.

२०१८ साली महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवलेला महाराष्ट्र केसरी बाला शेख व सागर बिराजदार यांच्यामध्ये अंतिम कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये दोघांनाही बक्षीसाची रक्कम देऊन सन्मान करण्यात आले व यात्रेची सांगता झाली.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणे–लोणावळा लोकल प्रवाशांनो लक्ष द्या! उद्या रेल्वे ब्लॉक; लोकल फेऱ्या रद्द, एक्सप्रेसच्या वेळापत्रकातही बदल

Saturday, 24 October 2026, 14:44

बंद घर, 12 फुटांचा खड्डा अन् संशयास्पद साहित्य; शिरूर येथील ‘त्या’ घरात नेमकं काय सुरू होतं? गूढ वाढलं

Saturday, 24 October 2026, 14:34

पुण्यात 9नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर! विभागीय आयुक्तांचा थेट आदेश; नेमकं कारण काय?

Saturday, 24 October 2026, 14:15

शंकर महाराजांचं दर्शन घेऊन निघाला अन् काही क्षणांत अनर्थ! पुण्यात 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

Saturday, 24 October 2026, 14:12

पुण्यात महानगरपालिकेची भिंत अचानक गेली चोरीला; नेमकं प्रकरण काय? वाचा

Saturday, 24 October 2026, 13:59

500 कोटींच्या आरोपाने महायुतीत ठिणगी! शिंदे–जरांगेंचा संघर्ष आता चौकशीच्या फेऱ्यात

Saturday, 24 October 2026, 13:45
Next Post

मुख्यमंत्री शिंदे कडाडले, 'आपल्या मर्यादेत राहा, सरकाला सगळं माहित आहे', दिला सर्वात मोठा इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp