राजू देवडे
लोणी धामणी : लोणी (ता. आंबेगाव) येथील भैरवनाथ विद्याधाम प्रशालेचा शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित क्रीडा महोत्सव शिरूरच्या सी. टी. बोरा महाविद्यालयात पार पडला. लोणी येथील श्री भैरवनाथ विद्याधामच्या खेळाडूंनी रिले स्पर्धेत १४ वर्षांखालील लहान गट, १७ वर्षांखालील मुले व मुली, १९ वर्षांखालील मुले अशा चारही विभागात प्रथम क्रमांक पटकावून दबदबा निर्माण केला. लोणी येथील श्री भैरवनाथ विद्याधामच्या खेळाडूंनी ५ सुवर्ण, ५ रौप्य व १० कांस्य अशी २० पदके मिळवली.
शिरूरच्या बोरा महाविद्यालयाच्या मैदानावर दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत १० शाळांचे ८०० खेळाडू सहभागी झाले होते. कबड्डी, धावणे, लांब उडी, गोळाफेक या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेसाठी प्रशालेचे क्रीडा शिक्षक अरुण साकोरे, ज्येष्ठ शिक्षक नामदेव डुंबरे, गोरख कौठाळे, भाग्यश्री गोलांडे, सुषमा शिंदे, अश्विनी माळी, प्रकाश चौधरी, उमेश अडसूळ, संदीप क्षीरसागर, नचिकेत फराटे, आदीनाथ दाते यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव नंदकुमार निकम, प्रशालेचे मुख्याध्यापक सुभाष वेताळ, सरपंच सावळेराम नाईक, लोणी येथील माजी विद्यार्थी विकास प्रोबोधनीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले.