पुणे : नऱ्हे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व लाईफव्हिजन मेडिकल फाउंडेसहन यांच्या वतीने येथील महाराजा पॅलेस हॉल मध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये उपस्थित रुग्णांना डोळ्यांची काळजी कशा प्रकारे घ्यावी, या संदर्भात तज्ज्ञ डॉक्टारांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरामध्ये सुमारे १८७ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. यापैकी १५ रुग्णांना मोतीबिंदू आढळून आला असून त्या रुग्णांना पुढील उपचारासाठी भरती रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या नेहा भूपेंद्र मोरे यांच्या वतीने देण्यात आली.
या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी हरीश वैद्य, डॉ. प्रवेश मोघे, विजया भामरे, प्रदीप गुंजाळ यांच्यासह लाईफव्हिजन मेडिकल फाउंडेशनची सर्व टीम उपस्थित होती.
आपल्या भागात राहणाऱ्या वृद्धांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, अनेकांना डोळ्यांशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या नागरिकांसाठी अशा शिबिरांचे आयोजन सातत्याने करण्यात येते. यामुळे रुग्णांमध्ये डोळ्यांच्या विकारासंबंधी जागरूकता निर्माण होण्यास मदत होत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या नेहा भूपेंद्र मोरे यांनी बोलताना सांगितले.